अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा, यूजीसीच्या निर्णयाविरोधात युवासेनेची सुप्रीम कोर्टात याचिका, युवक काँग्रेसचाही पाठिंबा
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांच्या परीक्षा सप्टेंबरच्या अखेरीस घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, यूजीसीच्या याच निर्णयाविरोधात युवासेनेने सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल केली
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांच्या परीक्षा सप्टेंबरच्या अखेरीस घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, यूजीसीच्या याच निर्णयाविरोधात युवासेनेने सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल केली आहे. युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली
विद्यार्थ्यांच्या हितासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या त्या राज्याच्या परिस्थितीनुसार प्रत्येक राज्यातील विद्यापीठांना अंतिम परीक्षांचा निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात यावा जेणेकरुन विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे”, असं वरुण सरदेसाई यांनी सांगितलं
दरम्यान, युवासेनेकडून अंतिम परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेला युवक काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ट्विट करत यूजीसीच्या निर्णयावर टीका केली आहे. कोरोना संकटात परीक्षा घेणे म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा