एमकेसीएलद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन परीक्षेसाठी विनामूल्य सराव सुविधा
कोरोना महामारीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात बहुपर्यायी-वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरुपात संगणक किंवा स्मार्टफोनवर ऑनलाईन पद्धतीने घरच्या घरी घेण्याचे धोरण सर्वसाधारणपणे निश्चित झाले आहे. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना संगणक किंवा स्मार्टफोनवरील ऑनलाईन परीक्षांचा व बहुपर्यायी-वस्तुनिष्ठ प्रश्न त्यावर सोडविण्याचा पूर्वानुभव नाही. त्यामुळे ते परीक्षेतील गुणांविषयी व यशाविषयी साहजिकच चिंतित आहेत.
अशा सर्व विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित अर्थात एमकेसीएलद्वारे अभिरूप (मॉक) ऑनलाईन परीक्षेची विनामूल्य सराव सुविधा mockexams.mkcl.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील ४६,००० विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. इच्छुक विद्यार्थी संगणक किंवा स्मार्टफोनद्वारे या संकेतस्थळावर आपली जुजबी माहिती देऊन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा