मुख्य सामग्रीवर वगळा

जनरल नॉलेज मराठी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल बोगद्याचे राष्ट्रार्पण:-

📚पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 ऑक्टोबर 2020 रोजी मनाली येथे जगातील सर्वात मोठ्या महामार्ग बोगद्याचे-अटल बोगद्याचे राष्ट्रार्पण झाले.

📚9.02 किलोमीटर लांबीचा हा बोगदा मनालीला लाहौल-स्पिती व्हॅलीशी वर्षभर जोडणार आहे. याआधी या व्हॅलीकडे जाण्याचा मार्ग बर्फवृष्टीमुळे सहा महिने बंद ठेवावा लागत असे.

📚हिमालयाच्या पीर पंजाल पर्वतरांगांमध्ये, समुद्रसपाटीपासून 3000 मीटर्स म्हणजेच 10,000 फुट उंचीवर हा बोगदा बांधण्यात आला आहे.  

📚या बोगद्यामुळे मनाली आणि लेह दरम्यानचे अंतर 46 किलोमीटर्स आणि 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे.हा बोगदा बांधण्यासाठी अद्ययावत अशा इलेक्ट्रोमेकेनिकल व्यवस्था, यात दोन्ही बाजूंनी खेळती हवा, SCADA नियंत्रित अग्निशमन व्यवस्था, प्रकाशव्यवस्था आणि नियंत्रण यंत्रणा बसवण्यात आली आहे. या बोगद्यात सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 

📚पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बोगद्यातून दक्षिण पोर्टल ते उत्तर पोर्टल असा प्रवास केला आणि या मुख्य बोगद्याच्या आजूबाजूला बांधलेल्या आपत्कालीन बोगद्यांची देखील पाहणी केली. तसेच, ‘द मेकिंग ऑफ अटल टनल’ हे चित्रप्रदर्शनही त्यांनी पहिले.

📚अटल बोगदा हा हिमाचल प्रदेश आणि नव्याने निर्माण झालेल्या लेह-लद्दाख या केंद्रशासित प्रदेशासाठी जीवनवाहिनी ठरणार आहे,तसेच या बोगद्यामुळे मनाली ते केलोंग दरम्यानचे अंतर 3 ते 4 तासांनी कमी होईल.

📚हिमाचल प्रदेश आणि लेह-लद्दाखचे काही भाग आता कायम देशाशी जोडलेले राहतील आणि त्यामुळे या भागाची प्रगती देखील लवकरात लवकर होऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

📚शेतकरी, बागकाम व्यावसायिक आणि युवक अशा लोकांनाही आता या मार्गाने राजधानी दिल्ली आणि इतर ठिकाणच्या बाजारात माल नेणे सोपे होईल.अशा सीमावर्ती भागांना जोडणाऱ्या प्रकल्पांमुळे सुरक्षा दलांना होणारा दैनंदिन वस्तू पुरवठा सुरळीत होईल तसेच गस्त घालणेही सोपे जाईल.

📚अटल बोगदा हा देशाच्या सीमाभागातल्या पायाभूत सुविधांनाही मजबुती देईल आणि सीमाभागात जागतिक दर्जाची संपर्क व्यवस्था निर्माण करण्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून हा बोगदा ओळखला जाईल.

📚 या भागातील पायाभूत सुविधा सुधारण्याची मागणी कित्येक वर्षांपासून प्रलंबित असूनही कित्येक दशके हा भाग मागासलेलाच राहिला, असे पंतप्रधान म्हणाले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Exam Schedule Of SRTMUN

 विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे रिवाईज परीक्षा चे वेळापत्रक आले आहे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.. ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद काही प्रश्न असतील तर इंस्टाग्रामवर विचारा 🙏🙏🙏🙏🙏 instagram

एमपीएससीचे लवकरच येणार ॲप 😃

व्हिडिओ लिंक सर्व सुविधा मोबाईलवर अद्ययवत सेवेसाठी निविदा प्रक्रिया सुरू 👇👇 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार सुधारावा गतीमानता यावी अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करत असतात. त्याच दृष्टीने एमपीएससी एक पाऊल पुढे टाकून उमेदवारांच्या सोयीसाठी तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पदवी शिक्षणानंतर राज्य शासनात नोकरी मिळावी म्हणून राज्यातील पदवीधर स्पर्धा परीक्षांचा ध्यास घेतात पुणे मुंबई औरंगाबाद या शहरात ग्रामीण भागातील एमपीएससी च्या अभ्यासासाठी विद्यार्थी येतात पुण्यात तर सुमारे 40 ते 50 हजार विद्यार्थी परीक्षांसाठी अर्ज भरतात तर महाराष्ट्रातून किमान तीन ते चार लाख विद्यार्थी विविध परीक्षा देतात. आयोगाकडून येणाऱ्या सूचना बदललेले नियम अभ्यासक्रम वेळापत्रक व त्या संदर्भातील परिपत्रक परीक्षा अर्ज कसे भरायचे होलटीकीट परीक्षेचा निकाल त्यानंतरची सर्व प्रक्रिया यासाठी संकेस्थळावर अवलंबून राहावे लागते. 🤔🤔      काय असणार ॲप मध्ये      🤔🤔 ॲप मध्ये एमपीएससीच्या कामातील प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात आला आहे यामध्ये पारदर्शकतेसाठी मानवी हस्तक्षेप पूर्णपणे ...

MSBTE चे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक

तर विद्यार्थी मित्रांनो MSBTE चे अंतिम वर्ष परीक्षा वेळापत्रक आले आहे याची लिंक  Timetable Link